कच्च्या तेलात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेलचे दर

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १५ मार्च २०२२ | आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.मागील आठवडाभरात कच्च्या तेलाच्या किंमती मोठी घसरण झाली असून हे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

भारतात आज मंगळवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. सलग १३१ व्या दिवशी इंधन दर स्थिर आहेत. आज जळगावमध्ये (Jalgaon) एका लिटर पेट्रोलचा दर १११.२९ रुपये इतका आहे. तर डिझेलचा ९४.२० रुपये प्रति लिटर इतका आहे.रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याचे मान्य केले तर देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.

कंपन्यांनी दरवाढीबाबत सावध भूमिका घेतली आहे. परिणामी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेश, पंजाबसह देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याचा अंदाज व्यक्त होत. असताना भारतीय तेल कंपन्यांनी आज 15 मार्चलाही इंधन दरात बदल केलेला नाही. पहा विविध जिल्ह्यातील पेट्रोल डिझेलचे दर.

बीड           १११.४७\  ९३.९४

बुलढाणा    ११०.०६\  ९३.६७
चंद्रपूर        ११०.११\  ९३.४५
धुळे           ११०.२५\  ९२.५१
गडचिरोली  ११०.७७\  ९३.५६
गोंदिया      १११.५८\  ९४.१२
बृहन्मुंबई   ११०.१६\ ९४.२९
हिंगोली      ११०.०७\  ९३.८४
जळगाव     ११०.०९\  ९३.५१
जालना      ११०.०९\  ९४.५९

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like