सोने-चांदीच्या दरात घसरण, पहा आजचे दर

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १५ मार्च २०२२ | रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान जारी केलेल्या सोन्या-चांदीच्या दरात आज घसरण झाली आहे.भारतीय सराफा बाजारात, सोमवारी, व्यापार आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्या-चांदीचे दर जाहीर झाले आहेत. ९९५ शुद्धतेचे १० ग्रॅम सोने आज ५१९४३ रुपयांना विकले जात आहे.चांदी ७०,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. सोमवारी सोन्याचा बाजार ५२३०४ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. आज हे सोने ५२००१ रुपयांच्या भावावर उघडले. सोमवारी ही चांदी ७८८४४ रुपयांवर बंद झाली होती. आज ६८५०० च्या दरावर उघडली.जळगाव बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या भावात ५९० रुपयाची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदी १५६० रुपये प्रति किलोने स्वस्त झाली आहे. यापूर्वी काल सकाळच्या सत्रात सोने ३७० रुपयाने तर चांदी १०० रुपयाने स्वस्त झाली होती.

मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४८,१०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,४७० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४८,२०० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,५७० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४८,१८० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,५४० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ७०० रुपये आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like