एप्रिल महिन्यात सुप्रिया सुळे आणि शरद पवार जळगाव दौरावर
खान्देश लाईव्ह | १५ मार्च २०२२ | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. पवार हे १५ एप्रिलला तर श्रीमती सुळे २५ मे रोजी येणार आहेत. . कार्यक्रमाचा सांगता समारोह २५ मेस होणार असून त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शरद पवार हे जळगाव जिल्ह्यात आले होते. तब्बल दोन वर्षांनी शरद पवार जिल्ह्यात येत आहे. पुढील महिन्यात १५ एप्रिल रोजी ते जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत चांदसर (ता. धरणगाव) येथे माजी आमदार मु. ग. पवार याच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.
याबाबत जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांनी सांगितले, की १५ एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता चांदसर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील जिल्ह्याचे आजी माजी मंत्री उपस्थित राहणार आहेत.
मुक्ताई हे संतपीठ आहे. त्याला ७२५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त मंदिरात सद्या नामजप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या उपस्थितीत मुक्ताईनगर येथे आदिशक्ती मुक्ताई सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष व संस्थानचे अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी दिली.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम