बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळला

खान्देश लाईव्ह I १९ डिसेंबर २०२२ I घरातून बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह गावातील ग्रामपंचायतीजवळ असलेल्या विहरीत आढळून आल्याची घटना जळगाव तालुक्यातील मोहाडी गावात रविवारी 18 डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आली. पुजा भीमराव पवार (वय-१६, रा. मोहाडी) असे मयत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील मोहाडी येथे पुजा भीमराव पवार ही तरुणी कुटुंबियांसह वास्तव्यास होती. १७ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घरात सर्व जण झोपलेले असतांना तरुणी घरातून निघून गेली. दुसर्या दिवशी सकाळच्या सुमारास तरुणीचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. अखेर तिच्या कुटुंबियांनी एमआयडीसी पोलीसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गावातील ग्रामपंचायतजवळील विहरीमध्ये तरुणीचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना गावर्यांना दिसून आला. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम