घरातून दोन मोबाईल चोरले ; गुन्हा दाखल

खान्देश लाईव्ह I १९ डिसेंबर २०२२ I शहरातील प्रजापत नगरातील सुनंदिनी नगरात असलेल्या एका पार्टेशनच्या घरातून मध्यरात्री अज्ञात चोरट्याने दोन मोबाईल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी रविवारी १८ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता अज्ञात चोरट्यांवर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, भावेश रघुनाथ सोनवणे (वय-४०) रा. सुनंदिनी नगर, प्रजापत नगर, जळगाव हा तरुण आपला परिवारासह वास्तव्याला आहे. पेंटरचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करतो.
शनिवारी १७ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता सर्वजण झोपले होत. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने घरात ठेवलेले १२ हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल चोरून नेल्याचे सकाळी ४ वाजता उघडकीला आले. त्यांनी परिसरात सर्वत्र मोबाईलचा शोध घेतला, परंतु दोन्ही मोबाईल मिळून न आल्याने अखेर रविवारी १८ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुधाकर शिंदे करीत आहे
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम