लग्नाच्या हॉलमधून दागिन्यांसह रोकड लांबविली

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I १९ डिसेंबर २०२२ I हॉटेल कमल पॅराडाईज येथे चूलत भाचीच्या लग्न समारंभाला नाशिक येथून आलेल्या दीपाली चेतन विसपुते यांच्या पर्समधून दागिने व रोकड असा एकूण ६८ हजार २०० रूपयांचा ऐवज चोरट्याने लांबविला. ही घटना बुधवार १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ ते ५.३० वाजेच्या दरम्यानात घडली. याप्रकरणी रविवारी 18 डिसेंबर रोजी दुपारी शनिपेठ पोलिसात गु्न्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

संदीप देवरे हे पाचोरा येथे आई ताराबाई, वडील आणि मुलांसह वास्तव्यास आहेत. त्यांच्या चुलत भाचीचा बुधवारी भुसावळ रस्त्यावरील कमल पॅराडाईज हॉटेल येथे लग्न समारंभ होता. त्यामुळे ते लग्न समारंभाला कुटूंबासह आले होते. तर त्यांची नाशिक येथील बहिण दीपाली विसपुते यांनी सुध्दा लग्नाला हजेरी लावली होती. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दिपाली ह्या आई ताराबाई यांच्यासोबत तिस-या मजल्यावर गप्पा मारत बसल्या होत्या. काळी वेळानंतर दीपाली यांनी त्यांची पर्स त्यांच्या आईकडे देऊन दुस-या मजल्यावर खोलीची चावी घेण्यासाठी लिफ्टने गेल्या. तेवढ्यात ताराबाई यांना त्यांच्या नातवाने चावी आणून दिल्यानंतर त्या खोलीकडे निघून गेल्या.

दीपाली विसपुते ह्या काही वेळाने पर्स उघडून पाहिल्यानंतर त्यातील दागिने आणि रोकड गायब झालेली आढळून आली. त्यांनी तत्काळ नातेवाईकांसह हॉटेल स्टाफकडे विचारपूस केली. पण, दागिने मिळून आले नाही. अखेर चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांचे भाऊ संदीप देवरे यांनी रविवारी शनिपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like