कौटुंबिक वादातून हाणामारी ; ८ जणांविरुद्ध गुन्हा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I १९ डिसेंबर २०२२ I धरणगाव शहरातील उड्डाण पुलाजवळ कौटुंबिक वादातून हाणामारी झाली असून या प्रकरणी धरणगाव पोलिसात ८ जणांविरुद्ध गुन्हा झाला आहे.

आशिष देविदास महाले (वय, ३६ रा. सातपूर नाशिक) यांची पत्नी त्यांच्यापासून घटस्फोट मागत आहेत. यातून दोघं परिवारामध्ये वाद सुरु आहेत. दि.१८ डिसेंबर २०२२ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शहरातील उड्डाण पुलाजवळ आशिष यांच्या सासरकडील नंदू श्रीधर महाजन, यश नंदू महाजन,भगवान श्रीधर महाजन,कैलास श्रीधर महाजन,यश नंदू महाजन (सर्व रा. महात्मा फुले नगर) यांचे मित्र व दोन महिलांनी त्यांना मारहाण केली. तसेच रस्त्यात अडवुन अश्लिल शिवीगाळ करुन तुला आज येथेच संपवुन टाकु अशी धमकी दिली. तर भगवान महाजन याने त्याच्या पिशवीतून काही तरी धारदार चाकु सारखे शस्त्र काढून आशिषच्या मानेवर दुखापत केली. तर यश महाजन याने त्याचे हातातील लोखंडी रोडने डोक्याचे मागच्या भागावर मारुन दुखापत केली. तसेच त्याच्या इतर मित्रांनी अश्लिल शिवीगाळ केली. कुणी तरी आपल्या खिश्यातील ३३ हजार ७०० रुपये व हातातील सोन्याची अंगठी व संमसंग A२० मोबाईल कोणी तरी काढून घेतला, असेही आशिष महाले यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. उपनिरी. अमोल गुंजाळ हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like