दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १९ नोव्हेंबर २०२२ | दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी पोलीस रेकॉर्डवरील आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे . तस्लीम शेख उर्फ काल्या सलीम शेख (३५), कलीम शेख सलीम शेख (३२) व गिरीश गोकुलसिंग जोहरी (२०, सर्व रा.दिनदयाल नगर, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

शहरातील नाहाटा महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूस काही संशयीत दरोड्याच्या तयारीत हत्यारांसह असल्याची माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी १७ रोजी रात्री सव्वा वाजेच्या सुमारास धाव घेत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. संशयीतांच्या ताब्यातून दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले. . या प्रकरणी सहाय्यक फौजदार शरीफोद्दीन काझी यांच्या फिर्यादीनुसार संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like