राज्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १८ नोव्हेंबर २०२२ | जळगाव जिल्ह्यातील सर्व प्राचार्य / मुख्याध्यापक व जळगांव जिल्हयात मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणारे सर्व अनुसूचित जमातींच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना याव्दारे कळविण्यात येते की अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या विविध शिष्यवृत्तीचा लाभ देणेसाठी महाराष्ट्र शासनामार्फत सन 2018-19 या शैक्षणिक वर्षांपासून महाडीबीटी पोर्टल सुरु करण्यात आलेले असून http://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावरुन अर्ज करणे आवश्यक आहे. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षांकरिता दिनांक 22 सप्टेंबर, 2022 पासून ऑनलाईन अर्ज भरणेस सुरुवात झालेली असून जुने / नवीन विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयांनी लवकरात लवकर अर्ज भरण्याची कार्यवाही करावी, तसेच सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील प्रलंबित असलेले व त्रुटीयुक्त अर्ज तात्काळ निकाली काढावेत. महाविद्यालयांनी शासननिर्णयातील अटी व शर्थीनुसार पात्र असलेले ऑनलाईन प्राप्त झालेले अर्ज तात्काळ तपासणी करावेत. विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयांनी अर्ज भरताना महाडीबीटी संकेतस्थळावर दिलेल्या मार्गदर्शक सूचना व नियमांचे वाचन करावे त्रुटीच्या पूर्ततेसाठी परत पाठविलेले अर्ज विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयांनी सुधारण करून पुन्हा पाठविणे आवश्यक आहे. पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थी तसेच महाविद्यालयांची राहील. शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांचे आधारसंलग्न बँकखात्यात हस्तांतरीत होत असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधार संलग्न करणे अत्यावश्यक राहील. सर्व महाविद्यालयांना कळविण्यात येते की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सदर योजनेबाबत माहिती मिळेल व विहित वेळेत विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरतील असे, आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like