लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
खान्देश लाईव्ह | १९ नोव्हेंबर २०२२ | लग्नाचे आमिष दाखवून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार जामनेर तालुक्यातील एका गावात उघडकीस आला असून या प्रकरणी तरुणाविरुद्ध पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . जगदीश अशोक पवार असे संशयीताचे नाव आहे.
जामनेर तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय मुलगी राहत असून असून संशयीत जगदीश अशोक पवार याने गुन्हा दाखल होण्याच्या तीन महिन्यांपूर्वी वेळोवेळी लग्न करण्याचे आमिष दाखवत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडीत मुलीने पहूर पोलीस स्टेशन गाठून जगदीश पवार याच्याविरुद्ध तक्रार दिली. पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप पाटील पुढील तपास करीत आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम