संधी साधत चोरट्यांनी पोलिस निरीक्षकाच्या घरातच केली चोरी

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ४ मार्च २०२२ | शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. अशातच चक्क पोलीस निरीक्षकाच्या घरी चोरी झाली आहे विठ्ठलवाडी येथील बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोकड मुद्देमाल लंपास केला आहे. पोलिस निरीक्षकाच्या घरातच घरफोडी झाल्याने या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विठ्ठलवाडी पिंपळा परिसर येथे पंकज मगन मेहेते हे पत्नीसह राहतात. पंकज मेहेते हे अमरावती येथे पोलीस निरीक्षक पदावर आहे. २ मार्च रोजी दुपारी २ वाजेला घराला कुलूप लावून मुंबईला कामाच्या निमित्ताने गेले असता दरम्यान मध्यरात्री चोरट्यांनी संधी साधत बंद घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले. घरातील कपाटात ठेवलेले ३ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने आणि ६ हजार रुपयांची रोकड असा ३ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पसार झाले.

दरम्यान ३ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास पंकज मेहेते यांनी त्यांचे मेहुणे देविदास अमृत जाधव रा. आनंदमित्र कॉलनी पिंप्राळा यांना फोन करून घरात चोरी झाल्याचे सांगितले. त्यानुसार देवीदास जाधव यांनी तातडीने शालक पंकज मेहेते यांच्या घरी जाऊन पाहणी केली असता अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडले आणि घरातील कपाटातील सामान अस्ताव्यस्त केलेले दिसून आले.

त्यांनी तातडीने रामानंदनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. देविदास अमृत जाधव (वय-४०, रा. आनंद मित्र कॉलनी पिंप्राळा) यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुरुवार ३ मार्च रोजी सायंकाळी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास रामानंदनगर पोलिस कर्मचारी करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like