रावेर तालुक्यातील अज्ञात इसमाकडू दोन माल वाहतूक गाड्यांच्या काचांची तोडफोड

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ४ मार्च २०२२ | जळगाव शहरातील रावेर तालुक्यातील निंभोरा येथील प्रतिष्ठित किराणा दुकान असलेल्या नरेंद्र ढाके यांचे पुन्हा एकदा नुकसान करण्याचा प्रयत्न केला आहे. या वेळी स्वतः च्या मालकीच्या दोन माल वाहतूक गाड्यांच्या काचा फोडल्याचा प्रकार काल रात्री उघडीस आली.

रावेर .येथील बस स्टँड शेजारी असलेल्या प्रसिद्ध किराणा व्यापारी नरेंद्र ढाके यांच्या टाटा ४०७ व पिकअप अशा दोन मालवाहतूक गाड्या त्यांच्याच मालकीच्या प्लॉटमध्ये उभ्या होत्या. त्या गाड्यांच्या काचांवर अज्ञात इसमाने विटा व दगड ड्रायव्हर साईटने मारून काचा फोडून नुकसान केले. विशेष म्हणजे नरेंद्र ढाके यांच्या प्लॉट मध्ये इतर वाहने असतांना त्यांना कुठलेही नुकसान न करता नरेंद्र ढाके यांच्याच वाहनांचे नुकसान करण्यात आले आहे.

घटनेची माहिती कळताच याबाबत निंभोरा पोलिसांत नरेंद्र नामदेव ढाके यांच्या तक्रारीची नोंद करण्यात आली असून तपास पोहेकॉ कोल्हे करीत आहेत. याच भागात या आधी सुद्धा सुभाष मोरे यांच्या वाहनांचे ही काचा फोडून नुकसान केले होते. याठिकाणी मोकळ्या परिसरात मदयपींचा वावर असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील रहिवाशी यांनी केली

निंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ, पोहेकॉ विकास कोल्हे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष डिगंबर चौधरी, सुनील कोंडे, भास्कर महाले, रोहिदास ढाके, कुंदन ढाके, कुंदन धांडे, राजीव बोरसे आदिंनी घटनास्थळी पाहणी केली.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like