कोरपावली येथे पार पडले अटल भूजल सर्वेक्षण योजनेचे विभाग प्रशिक्षण

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ४ मार्च २०२२ | जळगाव शहरातील अनेक जिल्ह्यात नवनवीन प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. पुणे भूजल सर्वेशन विभाग यंत्रणा जळगाव यांच्या मार्फत कोरपावली ग्रापंची अटल भूजल योजनेत निवड झाली. या करता प्रोजेक्टरद्वारे माहिती आणि ज्ञान दिलं जातं आहे. याच एक दिवसीय प्रशिक्षण शिबीराचा दुसरा टप्पा गुरुवारी ग्रापं कोरपावली येथे सरपंच विलास अडकमोल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले.

या प्रकल्पाबाबत प्रोजेक्टरद्वारे भूजल सर्वेक्षण विभाग यशदा मास्टर ट्रेनर जलजीवन मिशन जिप जळगाव दिपक शिंपी, मास्टर ट्रेनर प्रमोद थोरात, मास्टर ट्रेनर ममता पाटील यांनी माहिती दिली. यावेळी उपसरपंच हमीदाबी पिरण पटेल, माजी सरपंच जलील पटेल, समाजसेवक मुक्तार पटेल, ग्राप सदस्य अफरोज पटेल, ग्राप सदस्य आरिफ तडवी उपस्थित होते.

भविष्यात लोकसभागातून शेततळे, बंधारे, बांधून खालावलेली भूजल पातळी परत कशी पूर्वपदावर आणता येईल. पावसाळ्यातील पाणी योग्य प्रकारे जमिनीत जिरवून त्याचा चांगला उपयोग कसा होईल याबाबत मार्गदर्शन केले. तसेच प्रकल्प लवकरक सुरू होईल. ग्रापंचे मासिक ठराव आणि समिती स्थापन करण्यात येईल. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य, गावकरी, शेतकरी सर्वांनी मिळून मिसळून उपयोग घ्यावा, जनेकरून गावाचा फायदा होईल असेही सांगितले. यावेळी गावातील श्रीजी बचत गट, मंगलमूर्ती बचत गट, गायबनशाह बाबा बचत गट, प्रणिती बचत गट अशा सर्वच गटाच्या अध्यक्षा, सचिव सदस्या उपस्थित होत्या.

अंगणवाडी सेविका अलका महाजन, कमल महाजन, मदतनीस निशा तडवी, लता अडकमोल, रजनी येवले, आशा वर्कर हिराबाई पांडव, महिला एकता ग्रामसंघ्याच्या कोषाध्यक्ष सुनीता नेहेते, महिला एकता ग्रामसंघलिका मोनाली पाटील, कृषिसखी शुभांगी फेगडे, एकता महिला ग्रामसंघलिका सदस्या अर्चना नेहेते, विद्या फेगडे, सीआरपी ज्योस्ना अडकमोल, ज्योती अडकमोल, आशा तडवी, गीता पाटील, जयश्री पाटील, आशा महाजन, प्रतिभा पाटील, जयश्री पाटील, किसन तायडे, सलीम तडवी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like