भाजपातर्फे महावितरणच्या उपविभागीय कार्यकारीना वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ४ मार्च २०२२ | पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात सुरू असताना कृषिपंपांचा वीजपुरवठा अनियमित पद्धतीने व कमी दाबाने होत आहे. शेतकऱ्यांना पिकांसाठी पाण्याची गरज असते तर विजेचा वेळ वाढविणे किमान दिवसा किमान ०८ तास वीज पुरवठा करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन भाजपातर्फे येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यकारी अभियंता पाचोरा भाग, पाचोरा यांना देण्यात आले.

पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकरी महावीतरणाकडुन वारंवार येणाऱ्या वीज समस्यांमुळे मोठ्या संकटात सापडले. तालुक्याचे आमदार किशोर पाटील हे या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. दुसऱ्यांदा आमदार होऊन त्यांना अडीच वर्षे झाली. शेतकऱ्यांच्या जीवावर ते आमदार झाले असून त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांशी काही घेणे देणे नाही. शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा अनियमित पद्धतीने व कमी दाबाने होत आहे.

त्यामुळे सुरळीत करून दिवसा किमान ०८ तास वीज पुरवठा करण्याबाबत तात्काळ संबंधित विभागांतील अभियंत्यांना सूचना देऊन वरील समस्या मार्गी लावून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी यावेळी केली.

या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस तथा जि.प.सदस्य मधुकर काटे, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखा पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख हिम्मतसिंग निकुंभ, पं.स. सभापती वसंत गायकवाड, पं.स. मा. सभापती व सदस्य बन्सीलाल पाटील, पं.स.सदस्य ज्ञानेश्वर सोनार, सरचिटणीस गोविंद शेलार, नगरसेवक विष्णू अहिरे, भाजयुमो तालुकाध्यक्ष मुकेश पाटील, शहराध्यक्ष समाधान मुळे, वीरेंद्र चौधरी, योगेश ठाकूर, प्रशांत सोनवणे, मच्छिंद्र पाटील, अमोल नाथ आदी पदाधिकारी उपस्थित होते

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like