मुंबईत तीन लाखांचे भेसळयुक्त तूप जप्त

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १९ ऑक्टोबर २०२२ | दिवाळीसारख्या सणाच्या दिवसात ग्राहकांना सुरक्षित आरोग्यदायी आणि सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न नमुने तपासण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुंबईतूनसुमारे तीन लाख रुपयांचं संशयित भेसळयुक्त तूप जप्त करण्यात आलं आहे.

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच मुंबईतून सुमारे तीन लाख रुपयांचं संशयित भेसळयुक्त तूप जप्त करण्यात आलं आहे. मुंबईतील अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई कार्यालयाने अन्नसुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तुप विक्रेत्यांवर कारवाई केली आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like