शिंदे गटातील काही आमदारांना पश्चाताप – जयंत पाटील
खान्देश लाईव्ह | १९ ऑक्टोबर २०२२ | शिवसेना फुटल्यानंतर बाहेर पडलेल्यांना पश्चाताप होत असून ते पुनर्विचार करत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी लवकरच वेगळं चित्र असेल असंही म्हटलं आहे.
“पहिल्या दिवसापासून या सरकारमध्ये काहीच आलबेल नाही. जे लोक शिवसेनेतून फुटून गेले त्यांनी काहीना काही उद्देश व लाभ ठरवून केले आहे हे जनतेच्या लक्षात आले आहे. काही आमदार पश्चाताप करत असून काही आमदार पुनर्विचार करायला लागले आहेत. त्यामुळे पुढच्या काळात चित्र वेगळे असेल,” असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम