उद्धव ठाकरे गटाला दिलासा ; उद्धव ठाकरे गटाला दिलासा ; मशाल चिन्हांबाबत समता पार्टीची याचिका फेटाळली

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १९ ऑक्टोबर २०२२ | उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा दिलासा मिळाला असून ‘मशाल’ चिन्हावर दावा करणारी समता पार्टीची याचिका दिल्ली उच्च न्यायलयाने फेटाळली आहे.

 

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडून दोन गट पडले होते. तसेच खरी शिवसेना कुणाची यावरुन सर्वोच्च न्यालायत सुरु आहे. अद्याप यावर निर्णय झालेला नाही. मात्र, अंधेरी विधानसभा पोट निवडणुकीसाठी ठाकरे आणि शिंदे गटाला निडवणूक चिन्ह वाटप केले. यावर आक्षेप घेण्यात आला होता .

दरम्यान, निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवले होते. तसेच उद्धव ठाकरे यांच्या गटाला आणि एकनाथ शिंदेंच्या गटाला तात्पुरते नवे चिन्ह आणि नाव दिले होते. त्यात ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह मिळाले होते. मात्र हे “मशाल” चिन्ह आपले असल्याचा दावा करत समता पार्टीने केला. याविरोधात त्यांननी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like