मुलीच्या बापानेच तिच्यासह प्रियकराचे मृतदेह नदीत फेकले !

बातमी शेअर करा

 

खान्देश लाईव्ह | १९ ऑक्टोबर २०२२ | जात वेवेगवेगळी असल्याने मुलीच्या बापाने तिच्या प्रियकराला मारून दोघांचे मृतदेह नदीत फेकून दिल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकणी बापासह आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

१० ऑक्टोबर रोजी परसप्पा कराडी नावाच्या माणसाने आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार बागलकोट येथील पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली. त्याने आपली मुलगी घरातून पळून गेल्याचा संशय व्यक्त केला होता. तिला फूस लावून तिचं अपहरण झालं असावं, असा अंदाज कराडी याने वर्तवला होता. मात्र कोणाचंही नाव त्याने घेतलं नव्हतं. पोलिसांना त्याचा संशय आल्याने त्यांनी कराडी याचे फोन रेकॉर्ड्स तपासले.

दरम्यान, या मुलीचे विश्वनाथ नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचं पोलिसांना समजलं. तसंच विश्वनाथ आणि कराडी यांच्यात 1 ऑक्टोबर रोजी बोलणं झाल्याचंही कॉल रेकॉर्ड्सवरून उघड झालं. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. तेव्हा पोलिसांनी कराडीला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्याने जे सांगितलं ते भयंकर होतं.

कराडीची १७वर्षीय मुलगी राजेश्वरी हिचे 25 वर्षांच्या विश्वनाथ नेलागीशी चार ते पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. कराडी हा उच्च जातीचा असून विश्वनाथ याची जात तथाकथित कनिष्ठ जात आहे.1 ऑक्टोबर रोजी त्यांच्यात फोनवर तशी चर्चा झाली. विश्वनाथला नारागुंड येथे त्यांनी भेटायला बोलवलं. दोन गाड्यांमध्ये काही नातेवाईक त्याची वाट पाहत होते.

विश्वनाथला गाडीत बसायला सांगून त्याला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत विश्वनाथचा मृत्यू झाला. दरम्यान दुसऱ्या गाडीत राजेश्वरीची गळा आवळून हत्या करण्यात आली. त्यानंतर लूट झाल्याचा बनाव निर्माण करण्यात आला. कुटुंबाने त्या दोघांचे कपडे उतरवले आणि त्यांचे मृतदेह हनगुंड येथील कृष्णा नदीत फेकून दिले. नदीत असलेल्या मोठ्या माश्यांना आणि मगरींना ते खाता यावेत यासाठी कराडी कुटुंबाने असं केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. या प्रकरणी 18 ऑक्टोबर रोजी राजेश्वरीचे वडील आणि अन्य तीन नातेवाईकांना अटक केली असून अन्य तीन जण फरार आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like