चंद्रकांत सोनवणेंच्या शिक्षेला ‘सुप्रीम’कडून स्थगिती

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I १६ डिसेंबर २०२२ I घरकूल प्रकरणात सुनावण्यात आलेल्या शिक्षेला चोपडा मतदारसंघाचे माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे विधानसभेची निवडणूक लढू शकणार आहेत.

घरकूल गैरव्यवहार प्रकरणात सुरेशदादा जैन यांच्यासह तत्कालीन नगरपालिकेतील अनेक आजी-माजी नगरसेवकांना शिक्षा सुनावण्यात आली होती. हा निकाल ३१ ऑगस्ट २०१९ रोजी देण्यात आला होता. यात चोपडा विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचा देखील समावेश होता. त्यांना चार वर्षे कारावास तसेच १ लाख ४५ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. यामुळे ते विधानसभेची निवडणूक लढविण्यास अपात्र ठरले होते. याचमुळे २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या ऐवजी त्यांच्या सौभाग्यवती लताताई सोनवणे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्यांनी येथून विजय संपादन केला होता. मात्र मध्यंतरी त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय जात पडताळणी समितीने घेतला असून सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

या पार्श्‍वभूमिवर, चंदूअण्णांनी आपल्या शिक्षेला स्थगिती मिळावी म्हणून न्यायालयात दाद मागितली होती. यावर १३ ऑक्टोबर २०२१ रोजी उच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावल्याने त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. यावर कोर्टात सुनावणी होऊन गुरूवारी निकाल लागला. यामध्ये त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे आता त्यांचा आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणी प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्यातर्फे ऍड. सुधांशू चौधरी आणि वसंत भोलाणकर यांनी काम पाहिले. दरम्यान, त्यांच्यासोबत जळगावचे नगरसेवक दत्तात्रय कोळी यांच्या शिक्षेला देखील सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत ते निवडणूक लढवू शकणार आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like