क्रीडा संकुलाच्या कामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी
खान्देश लाईव्ह I १६ डिसेंबर २०२२ I पाटखडकी सबस्टेशन जवळ असणाऱ्या चाळीसगाव तालुका क्रीडा संकुलाच्या कामासाठी राज्य शासनाने ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबाबत नुकताच शासन निर्णय प्रकाशित झाला असून तात्काळ ५० लक्ष रूपये वितरित देखील करण्यात आले आहेत.
आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नाने चाळीसगाव तालुक्यातील क्रीडाक्षेत्राला प्रथमच इतका भरघोस निधी उपलब्ध झाला आहे. राज्याचे क्रीडामंत्री नामदार गिरिषभाऊ महाजन हे स्वतः क्रीडापटू आहेत, आमदार चव्हाण यांच्या मागणीची दखल घेऊन तात्काळ निधी मंजूर केल्याबद्दल त्यानी नामदार महाजन यांचे व राज्य शासनाचे आभार मानले आहेत.
सदर निधीचा सुयोग्य विनियोग करून तालुक्यातील क्रीडापटूना राज्यस्तरीय दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याची प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे. याबाबत तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांना माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की, सध्या अस्तित्वात असलेला जॉगिंग ट्रॅकचे पूर्ण नूतनीकरण व मजबुतीकरण करण्यात येऊन त्याला सर्व प्रकारचे मैदानी खेळ (एथिलेटिक्स) गोळाफेक, फुटबॉल योग्य बनविले जाईल तसेच मैदानावर पाणी साचू नये यासाठी अत्याधुनिक पर्पोरेट पाईप प्रणाली अवलंबली जाणार आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम