अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग ; एकाला अटक

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I १६ डिसेंबर २०२२ I अल्पवयीन विद्यार्थिनीचा सतत पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय दिलीप बाविस्कर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन विद्यार्थिनीचा अजय बाविस्कर हा सुमारे १५ दिवसापासून पिडीतेचा शाळेत जातांना व येतांना पाठलाग करत होता. त्यामुळे पिडीतेने शाळेत जाणे बंद केले होते. एवढेच नव्हे तर अजय बाविस्कर हा पिडीतेचा दुकानावर किंवा चक्कीवर जाता येता देखील पाठलाग करत होता.

 

याबाबत पिडीतेने आपल्या आजीला सर्व हकीगत सांगितली होती. एकेदिवशी पिडीता आपल्या नातेवाईक मुलीसोबत घराच्या समोर अंगणात बैंडमिंटन खेळत होतो. तेव्हा तेथे अजय बाविस्कर आला आणि त्याने वाईट उद्देशाने पिडीतेचा हात पकडला. तसेच पिडीतेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करुन जमीनीवर पडलेली काडी उचलून पिडीतेला मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत संशयित आरोपी अजय बाविस्कर याला ताब्यात घेतले असून पुढील तपास स.पो.नि राकेशसिंह परदेशी हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like