मालमत्ता परस्पर दुसऱ्याच्या नावे विक्री केल्याप्रकरणी ८ जणांवर गुन्हा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I १६ डिसेंबर २०२२ I शहरातील मेहरूण शिवारात असलेली मालमत्ता परस्पर दुसऱ्याच्या नावे करून विक्री केल्याप्रकरणी सहाय्यक दुय्यम निबंधक, मंडळ अधिकारी, तलाठीसह ८ जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. वसंत तुकाराम भंगाळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

पिंप्राळा येथील रहिवासी असलेले वसंत तुकाराम भंगाळे (वय-७४) यांच्या पत्नी मयत झाल्यावर मेहरूण शिवारातील सर्व्हे क्रमांक २१/१ब मधील १००८.३३ चौ. फूट मालमत्तेत बांधलेले घर त्यांच्या नावे झाले होते. १६ जुलै २०१० ते २२ जुलै २०२२ पावेतो मोहम्मद इरफान मोहम्मद तांबोळी (रा.मेहरूण) याने इतरांना सोबत घेत परस्पर मिळकतीवर कब्जा केला आणि त्याची विक्री केली. वसंत भंगाळे यांनी याप्रकरणी फसवणूक झाल्याची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार मोहम्मद इरफान मोहम्मद तांबोळी (रा.मेहरूण), मो. इद्रिस मो. खलील (रा.कानळदा), अशोक माळी, रमेश पाटील, जगदीश पाटील, दि.२२ जुलै २०२२ रोजी कार्यरत असलेले सहाय्यक दुय्यम निबंधक व त्यांचे कार्यालयीन कर्मचारी, जळगाव शहर मंडळ अधिकारी राजेश शंकर भंगाळे, मेहरूण तलाठी राजू कडू बाऱ्हे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार रविंद्र सोनार हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like