अमळनेरच्या विद्यार्थ्यांच्या बसला गुजरातमध्ये अपघात

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I १६ डिसेंबर २०२२ I अमळनेर शहरातील लोकमान्य हायस्कूलमधील सहलीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. अमळनेरहून गुजरात राज्यातील पावागडला जाणाऱ्या विश्वकर्मा टूरिस्ट ट्रॅव्हल्सही विद्यार्थ्यांनी भरलेली खासगी प्रवासी बस उलटल्याची घटना घडली. दरम्यान या खाजगी बस चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. या अपघाताची माहिती निझर पोलीसांनी दिली आहे.

महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील तापी जिल्ह्यातील कुकरमुंडा तालुक्यातील राजपूर गावाजवळ शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात काही विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात सुमारे ४ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या बसमध्ये दहावीत शिकणारे ५१ विद्यार्थी आणि शिक्षकांसह ६५ प्रवासी होते. बस चालकाच्या चुकीने बस रस्त्याच्या कडेला उतरली आणि बस विजेच्या खांबाला धडकून उलटली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच निझर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बस चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like