जळगावच्या व्यावसायिकाची ३१ लाखांत फसवणूक ; गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I १६ डिसेंबर २०२२ I तेरा महिन्यात रक्कम दुप्पट करुन देण्याच्या आमिषाला बळी पडून एका व्यावसायिकाची तब्बल 31 लाख 50 हजार रुपयात फसवणूक झाली आहे. या प्रकरणी औरंगाबाद येथील सहा जणांविरुद्ध जळगाव जिल्हा पेठ पोलिस स्थानकात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महेश तुकाराम भोळे यांनी फिर्याद दिली आहे.

या संदर्भात अधिक असे की, अरुण नागोराव अंभोरे यांनी शेंद्रा एमआयडीसी औरंगाबाद येथे इंडोपर्ल या नावाने शिंपल्यापासून मोती तयार करण्याची कंपनी स्थापन केली. या कंपनीत त्यांनी पत्नी सौ. मंदा अरुण अंभोरे, मुलगी दिपाली अंभोरे, राहुल शेळके, विनोद बाहेकर, आकाश आठल्ये अशा सर्वांना या कंपनीत संचालक केले आहे. अवघ्या तेरा महिन्यात दुप्पट रक्कम करुन दिली जाईल असे बोलून त्यांनी आसोदा येथील महेश तुकाराम भोळे यांचा विश्वास संपादन केला. भोळे यांचे जळगाव शहरातील विसनजी नगर भागात फ्लॉवर पॉईंट नावाचे दुकान आहे. १३ महिन्यात 63 लाख रुपये मिळतील, या मोहाला बळी पडून महेश भोळे यांनी संशयित आरोपींना 31 लाख 50 हजार रुपये दिले. त्यावर संशयित आरोपींनी स्वाक्षरी केलेले कोरे चेक महेश भोळे यांना देत कोणताही करारनामा केला नाही. मुदत संपल्यावरही पैसे परत मिळत नसल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे महेश भोळे यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी अखेर जिल्हापेठ पोलिस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील सहायक पोलिस निरीक्षक किशोर पवार हे करत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like