रावेर येथे महावितरणची २२ जणांविरुद्ध कारवाई

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I १५ डिसेंबर २०२२ I वीज चोरट्यांविरोधात महावितरणने धडक मोहिम राबवण्यास सुरूवात केली असून शहरात वीज चोरी करणार्‍या 22 जणांविरुध्द कारवाई करण्यात आल्याने वीज चोरट्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

रावेर शहरातील राजीव पाटील नगर, रोकडा हनुमान नगर, विश्वकर्मा नगर आणि शिक्षक कॉलनी परीसरात उप कार्यकारी अभियंता अनिल पाटील यांचा मार्गदर्शनाखाली वीज चोरट्यांविरोधात कारवाई करण्यात आली. 22 लोकांवर कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. यावेळी सहा.अभियंता दिलीप सुंदराणी, समीर तडवी,गणेश दहीभात, श्रीकृष्ण बर्कुल, मुकेश ठाकरे, संतोष जाधव व इथर कर्मचारी सतीश चौधरी, भिका साळुंखे, चंद्रकांत ठाकूर, चेतन भरते, अरुण माळी, कल्पेश पाटील, महेश चौधरी आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like