विवाहितेचा ५० हजारांसाठी छळ
खान्देश लाईव्ह I १५ डिसेंबर २०२२ I नेहमीच मुलीच झाल्या तसेच माहेरून 50 हजार रुपये न आणल्याने शहरातील माहेर व अजनी येथील सासर असलेल्या विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह ाच संशयीतांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदार मार्गेरट मॅनवन डिसूजा (45 पंधरा बंगला, जलालशाह बाबा दर्ग्याजवळ, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, मुलीच झाल्या तसेच माहेरून 50 हजार रुपये न आणल्याने पतीसह सासरच्यांनी नेहमीच छळ केला तसेच मारहाण करीत पेटवून देण्याची धमकी दिली. हा प्रकार 16 मे 2015 ते 28 जू 2022 दरम्यान घडला. छळ असह्य झाल्याने विवाहिता माहेरी आल्या व त्यांनी बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्याने पती मॅनवल अँथोनी डिसोजा, फिलोनी अँथोनी डिसोजा (80), मोठी नणंद अंँजेलिना अरुण नकुलेस (60), नंदोई अरुण नकुलेस (65, सर्व रा.न्यू बबलूखेडा बोगन, किराणा दुकानासमोर, अजनी, नागपूर), लहान नणंद कारमल फर्नेंडीस (55, कणान, जि.नागपूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक भूषण उखा जैतकर करीत आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम