पाणीपुरी विकणाऱ्यास बेदम मारहाण

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I १५ डिसेंबर २०२२ I पाणीपुरी देण्यास थोडावेळ थांबा असे सांगील्याचे राग आल्याने एका व्यक्ति कडुन लोटगाडीवर पाणीपुरी विकणाऱ्यास बेदम मारहाण करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असुन, यावल पोलीस ठाण्यात त्या गुंडगीरी करणाऱ्या विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पप्पु समीरसिंग रावत वय३० वर्ष राहणार डांभुणी तालुका यावल ( परप्रांतीय ) हे डांभुर्णी गावात वास्तव्यास राहुन गावातील बसस्टॅन्ड परिसरात दिनांक १४ डिसेंबर रोजी सायंकाळी आपल्या लोटगाडीवर भेलपुरी पाणीपुरीचा व्यवसाय करीत असतांना गावातील भैय्या नांवाच्या व्यक्तिने दारूच्या नशेत पाणीपुरी खाण्यासाठी दुकानावर येवुन दुकानदारास पाणीपुरी मागीतली त्यावर दुकानदाराने थोडावेळ थांबण्याचे सांगीतल्याचे राग आल्याने त्या दारूड्या गावगुंड ग्राहकाने पाणी पुरीच्या गाडीच्या काचाची फोडुन दुकानदारास शीविगाळ करून लाथाबुक्यानी मारहाण करीत तुला जिवन सोडणार अशी धमकी दिली.

याबाबत पप्पु रावत यांनी यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्याने त्या भेय्या नांवाच्या दारूड्याविरूध्द भादवी कलम ३२३ ,५०४, ५०६ , ५१०, ४२७प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like