क्षुल्लक कारणावरून महिलेस मारहाण व विनयभंग

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I १५ डिसेंबर २०२२ I शेतातील मोटार बंद करण्याच्या कारणावरून पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणारी महिलेला मारहाण करून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील एका गावात ३० वर्षीय विवाहिता ह्या आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास महिला व तिची सासू शेतातील मका पिकास पाणी देत असतांना जितेंद्र रविंद्र चव्हाण हा शेतात येऊन विहीरीवरील पाण्याची मोटर बंद करत फिर्यादी व फिर्यादीची सासु यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण करत दगड मारुन जखमी करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. दगड मारल्याने फिर्यादीची सासु यांचे तोंडातील तीन दात पडले. तसेच फिर्यादीची सासु हिच्या मनाला लज्जा वाटेल असे वक्तव्य व कृत्य केले. घटनास्थळी रामदास नथ्थु चव्हाण व निर्मला रामदास चव्हाण हे येवुन फिर्यादी व फिर्यादीची सासु यांचे मोबाईल हिसकावून घेतला. पिडीतेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये जितेंद्र कौतिक चव्हाण, रामदास नथ्थु चव्हाण व निर्मला रामदास चव्हाण या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील हे करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like