नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी सुनील फुलारी

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I १४ डिसेंबर २०२२ Iनाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सुनील फुलारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य शासनाने वरिष्ठ आयपीएस अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यात एकाच वेळेस ३० अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांचीही बदली झाली असून, त्यांच्या जागी सुनील फुलारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते याआधी मोटार परिवहन, पुणे येथे विशेष पोलिस महानिरीक्षक होते.

दरम्यान, या बदल्यांमध्येच मिलींद भारंबे यांची नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी निवड करण्यात आलेली आहे. सदानंद दाते यांना दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) अपर पोलिस महासंचालकपद देण्यात आले आहे. विश्‍वास नांगरे पाटील यांची बदली लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अपर पोलिस महासंचालकपदी करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like