पारोळा तालुक्यात घरात झोपलेल्या महिलेवर अत्याचार
खान्देश लाईव्ह I १४ डिसेंबर २०२२ I तालुक्यातील एका गावातील महिलेवर घरात झोपलेली असतांना एकाने मुलांना जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी सुरेश भिकन पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पिडीतेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १० डिसेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास मुलांसह घरात झोपलेली होती. रात्री ११ वाजेच्या सुमारास कुणीतरी अंगाला स्पर्श करत असल्यामुळे पिडीतेला जाग आली. त्यावेळी सुरेश पवार याने पिडीतेचे तोंड दाबून तुझ्यासह मुलांनाही मारून टाकेल. यानंतर त्याने पिडीतेच्या इच्छेविरुद्ध जबरीने शारीरीक संबंध प्रस्थापित केला. यानंतर पिडीतेने सदरची घटना चुलत दिराला सांगत दोघे जण सुरेशच्या घरी जाब विचारायला गेलेत. याठिकाणी त्याच्या वडिल वडील भिकन हरचंद पवार याने त्यांच्या विरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला मारहाण करुन शिवीगाळ व धमकी दिल्याबाबत खोटी तक्रार दिली. परंतू यानंतर नातेवाईकांनी हिंमत दिल्यानंतर पिडीतेने सुरेशविरुद्ध पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनी निलेश गायकवाड हे करीत आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम