मोठी बातमी : आरएल समूहावर जळगावसह दिल्लीतील सीबीआयची धाड

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I १४ डिसेंबर २०२२ I खान्देशातील प्रसिद्ध राजकीय नेते तथा उद्योजक राजमल लखीचंद ज्वेलर्स समूहाचे संचालक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खा.ईश्वरलाल जैन यांच्या आरएल समूहावर दिल्ली सीबीआयच्या सुमारे ६० जणांच्या पथकाने जळगाव, नाशिक व ठाणे येथील अस्थापना व घरांवर छापे टाकल्याची माहिती समोर येत आहे. या कारवाईमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

राजमल लखीचंद ज्वेलर्स म्हणजेच आरएल ही जामनेरच्या ईश्वरलाल जैन यांची जळगावात मोठी पेढी आहे. त्यांच्या ठाणे, कोल्हापूर आणि पुण्यातही पेढया आहेत. सोनं खरेदीसाठी महाराष्ट्रातील असंख्य ग्राहक राजमल लखीचंद ज्वेलर्सलाच प्राधान्य देतात. आर एलग्रुपची पेढी महाराष्ट्राच्या सुवर्ण क्षेत्रात अतिशय नावाजलेली कंपनी आहे. राजमल लखीचंद या फर्मचे सर्वेसर्वा ईश्‍वरलाल जैन हे राष्ट्रवादीचे माजी खजिनदार, तसेच राज्यसभेचे खासदार ही होते. राष्ट्रवादीशी संबंधित असलेल्या एका नेत्याचं हे प्रकरण समोर आल्याने पुन्हा एक खळबळ उडाली आहे.

काय आहे हे प्रकरण
राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वर जैन यांच्या आर. एल. ग्रुप म्हणजेच राजमल लखीचंद या सोने क्षेत्रातील नामांकित कंपनीने स्टेट बँकेकडून घेतलेलं कर्ज मुदतीत न भरल्याने कर्जासाठी तारण ठेवलेल्या विविध मालमत्तांवर स्टेट बँकेने जून २०१७ मध्ये प्रतिकात्मक ताबा घेतला होता. त्यामुळे राजमल लखीचंद ग्रुपला या मालमत्ता आता परस्पर विकता येणार नव्हत्या. पण या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचं जैन यांनी सांगितलं होते. जैन यांच्या आर.एल ग्रुपने स्टेट बँकेकडून तारण ठेव योजनेतून 500 कोटीचं कर्ज घेतलं होतं. पण कर्जाची परतफेड वेळेत न केल्याने स्टेट बँकेने कंपनीच्या विविध मालमाता प्रतिकात्मक ताब्यात घेतल्या होत्या. याबाबतची माहिती नोटिसीद्वारे दिल्यानंतर जळगावच्या राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. पण बँकेची कारवाईनंतर जैन यांनी स्टेट बँकेची कारवाई नियमबाह्य असल्याचं म्हटले होते. कराच्या पैशांची नियमापेक्षा जास्त रक्कम स्टेट बँकेने वसुली केल्याने, बँकेकडून आपलेच घेणे लागते. त्यामुळे बँकेच्या कारवाईबाबत आपण हायकोर्टात दाद मागणार असल्याचं त्यांनी सांगितलं होते. तर दुसरीकडे बँकेकडून प्रतिकात्मक ताबा असल्याने, त्या विषयी आपल्याला कोणतीही तक्रार नाही. याविषयी आपली बँकेशी बोलणी अंतिम टप्प्यात असून यावर लवकरच तोडगा निघेल अशी अपेक्षा जैन यांनी त्यावेळी व्यक्त केली होती.

आज एकाचवेळी टाकला छापा !
मुंबई येथील असून स्टेट बँकेकडून घेतलेल्या कर्ज प्रकरणावरून ईश्वरलाल जैन यांच्याविरुद्ध तक्रारी होत्या. त्या प्रकरणातच हे पथक सकाळपासून ठाण मांडून असल्याचे कळते. ईश्वरलाल जैन हे आपल्या कार्यालयातच बसून होते. तेथे या पथकाकडून जाबजबाब घेण्यात येत होते, असेही कळते. आरएल समूहाच्या राज्यभरात शाखा असून चारचाकी वाहनांचे देखील शोरुम आहे. स्टेट बँकेतील ५२५ कोटींच्या थकीत कर्जापोटी दिल्लीतील एका यंत्रणेच्या पथकाने आरएल समूहाच्या जळगाव तीन, नाशिकमधील एक तर ठाणे व जळगावातील घरांवर मंगळवारी सकाळच्या सुमारास एकाचवेळी छापा टाकला. याठिकाणाहून त्यांना लागणारे कागदपत्रे घेवून पथक माघारी परतले असल्याचे कळते

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like