हिंगणे बुद्रुक येथे माजी सरपंचावर रोखले पिस्तूल

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I १४ डिसेंबर २०२२ I तालुक्यातील हिंगणे बुद्रुक येथे मंगळवारी गावातीलच एकाने माजी सरपंचाच्या छातीवर बंदूक लावत तुला शूट करुन टाकतो, मग पहा तुझ्या पॅनलचे काय होते?, अशी धमकी दिली. याप्रकरणी ज्ञानेश्वर उर्फ नाना पंडीत गोसावी, तुषार संजय गोसावी (दोघे रा. हिंगणे ता. जामनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास हिंगणे बुद्रुक येथील माजी सरपंच अनिल चौधरी हे गावात असताना ज्ञानेश्वर उर्फ नाना पंडीत गोसावी याने त्यांचे छातीला बंदूक लावून धमकी दिली. तर त्याच्यासोबत असलेला तुषार संजय गोसावी याने कॉलर पकडून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी नागरीक जमा झाल्याने दोघांनी पळ काढला. अनिल चौधरी यांचा नर्सरी आणि शेतीचा व्यवसाय आहे. 13 डिसेंबरच्या सायंकाळी ज्ञानेश्वर आणि तुषार या दोघांनी अनिल चौधरी यांना पाच हजार रुपयांची मागणी केली. यावर अनिल चौधरी यांनी आपल्याजवळ आज पैसे नसून काम असल्यास उद्या देतो असे म्हटले.

अनिल चौधरी यांच्या बोलण्याचा राग आल्यामुळे ज्ञानेश्वर गोसावी याने अनिल चौधरी यांच्या छातीवर पिस्तुल रोखून तुला आज रात्री आठ वाजेपर्यंत जीवंत ठेवणार ठेवणार नाही अशी धमकी दिली. तु मेल्यावर तुझ्या निवडणूक पॅनलचे काय होईल ते मी पाहून घेईन अशी देखील धमकी दिली. चौधरी यांच्या फिर्यादीवरुन ज्ञानेश्वर गोसावी व तुषार गोसावी यांचे विरुध्द भादंवि कलम ३०७, ३२३ शस्त्र कायदा ३/२५, ३४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक दिपक मोहीते तपास करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like