तिक्ष्ण हत्यार घेवून दहशत माजविणाऱ्या तरूणाला अटक

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I १४ डिसेंबर २०२२ I शहरातील शिरसोली नाका परिसरात कमरेला लोखंडी तिक्ष्ण हत्यार घेवून दहशत माजविणाऱ्या तरूणाला एमआयडीसी पोलीसांनी मंगळवारी १३ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील शिरसोली नाका परिसरात गुरुजीतसिंग सुजाणसिंग बावरी (वय-२२) रा. सद्गुरु नगर, शिरसोली नाका, तांबापुरा हा तरुण १५ इंच लांबीचा लोखंडी तिक्ष्ण हत्यार हातात घेऊन परिसरात दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवार १३ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता कारवाई करत संशयित आरोपी गुरुजीतसिंग सुजाणसिंग बावरी याला ताब्यात घेतले. त्याच्या जवळील १५ इंच लांबीचा लोखंडी तिक्ष्ण हत्यार हस्तगत केला आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल रगडे यांच्या फिर्यादीवरून गुरुजीतसिंग सुजानसिंग बावरी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अल्ताफ पठाण करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like