बोदवड येथे २२ वर्षीय युवकाची आत्महत्या

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २२ नोव्हेंबर २०२२ | शहरातील शिवद्वाराजवळील 22 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. रुपेश मुरलीधर माळी (22) असे मयत युवकाचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

बोदवड शहरातील रहिवासी रूपेश हा मोठा भाऊ दीपकसोबत रहात होता व कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास रूपेशने भाड्याने राहत असलेल्या घरातील छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच त्याला बोदवड ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले मात्र तो पर्यंत उशीर झाल्याने डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी दीपक मुरलीधर माळी (25) यांच्या खबरीनुसार बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक फौजदार शेजोळ करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like