यावल तालुक्यात अवैध गावठी दारुचे अड्डे उद्वस्थ

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २२ नोव्हेंबर २०२२ | यावल तालुक्यातील फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी व यावल पोलिसांच्या पथकाच्या संयुक्त धाडसत्रातील शहर व तालुक्यातील अंजाळे, पिंप्री या गावात गावठी हातभट्टी वर छापे टाकून ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

फैजपूरचे विभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी तालुक्यातील अंजाळे, पिंप्री व तसेच शहरालगत अवैध गावठी हातभट्टीची दारू सुरू असल्या बाबत गोपनीय माहिती मिळाली होती. पोलीसांनी या माहितीच्या आधारे सहायक फौजदार अविनाश चौधरी, हवालदार दिलीप तायडे, सुमित बाविस्कर यांनी अंजाळे शिवारात छापा टाकत कैलास बळीराम सपकाळे (अंजाळे) हा हातभट्टीची दारू गाळताना आढळला मात्र पोलिसांचे पथक पाहून संशयिताने हातभट्टीवरून पळ काढला. हातभट्टीवरून दहा हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची कार्यवाही करण्यात आली आहे. यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, सुशील घुगे, गणेश ढाकणे, गणेश वाघ यांच्या पथकास सूचना दिल्याने यावल-चोपडा रस्त्यावर हडकाई नदीच्या पात्रातील पुलाजवळ कारवाई करण्यात आली. यावेळी गावठी हातभट्टीची दारू गाळणी करताना भैया भगवान शिंदे हा आढळला मात्र तो पसार झाल्यानंतर १२ हजार ५०० रुपयांचा दारू तयार करण्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या पथकाने तालुक्यातील पिंप्री शिवारात नदीच्या काठी छापा टाकून पोलीसांनी प्रकाश साळुंखे याच्या ताब्यातून ८००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like