गिझरमधून गॅसची गळती ; मुलाचा गुदमरून मृत्यू

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २२ नोव्हेंबर २०२२ | शहरातील रेणुका नगरात अंघोळ करताना गिझरमधून गॅसची गळती झाल्याने गुदमरून साई उर्फ यश वासुदेव पाटील (१६) या मुलाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना सोमवार, २१नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.

एरंडोल शहरातील रा.ती.काबरे विद्यालयाचा विद्यार्थी यश पाटील हा सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास अंघोळीसाठी गेला मात्र बराच वेळ झाल्यामुळे तो बाथरूममधून बाहेर न आल्यामुळे आई-वडिलांना चिंता वाटल्याने त्यांनी दरवाजा ठोठावला असता काही एक प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी दरवाजा तोडण्यात आला असता तो बेशुद्धावस्थेत आढळल्याने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. यावेळी आई-वडिलांनी एकच हंबर्डा फोडला. हे वृत्त वार्‍यासारखे शहरात पसरले असता नागरीकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. दरम्यान, मयत यश हा रेणुका नगरातील रहिवासी व काबरे विद्यालयाचे माध्यमिक शिक्षक व्ही.टी.पाटील यांचा मुलगा आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like