एसटी चालकाने गळफास घेऊन केली आत्महत्या
खान्देश लाईव्ह | १४ मार्च २०२२ | एसटी संपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यातच एका दिवसात तीन ST कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यात रावेर आगारातील संपकरी एसटी चालकाने गळफास घेत आत्महत्या केली.
चालक कन्हैया भिका अटकाळे (वय ४७, रा. थेरोळा (ता.रावेर)) असं आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. चालक कन्हैया भिका अटकाळे स्वतःच्या घराच्या छताला दोर बांधून गळफास घेत आत्महत्या केली. पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामध्ये चालक अटकाळे हेदेखील सहभागी होते. संपामुळे आर्थिक अडचणीतून आलेल्या नैराश्यापोटी त्यांनी आत्महत्या केली, अशी कुजबूज एसटी कर्मचाऱ्यांमध्ये होती. गेल्या चार महिन्यांपासून एसटी प्रशासनातर्फे वेतन बंद केलेले असल्यामुळे घरखर्च भागवता येत नसल्याच्या विवंचनेतून आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न केला.
त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समोर आले नव्हते. याप्रकरणी विशाल अटकाळे यांच्या खबरी वरून रावेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार अर्जुन सोनवणे करत आहेत. दरम्यान, मृत चालक कन्हैया अटकाळे यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगी व एक अविवाहित मुलगा आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम