एकनाथ खडसे आणि अरुण पाटील यांच्यात जोरदार टीका

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १४ मार्च २०२२ | निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळी आपल्या कामाला लागलेले आहेत अनेक दौरे कार्यक्रम पार पाडण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे. जळगाव येथील मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रविवारी कार्यक्रम पार पडला. दरम्यान, जिल्हा बँक निवडणुकीतील उमदेवारीवरुन माजी मंत्री एकनाथ खडसे व माजी आमदार अरुण पाटील यांच्यात जोरदार वाद झाला. राज्यात अनेक प्रकरणावरून वातावरण तापलेलं असताना आणखी एका नव्या प्रकरणाची भर पडली आहे

जळगाव येथील मुक्ताईनगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यक्रमात खडसे म्हणाले की, आपण पॅनलच्या लोकांना निवडून आणले. तुम्ही गिरीश महाजन यांना जाऊन भेटले म्हणून पॅनलच्या बाहेर गेले. असा टोला एकनाथ खडसे यांना अरुण पाटील यांना लगावला. यावर अरुण पाटील यांनी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीचे निष्ठावंत असूनही आम्हाला पॅनलमध्ये जागा मिळाली नसल्याचे सांगितले. वर खडसे म्हणाले की, तुम्ही, गिरीश महाजन यांना जाऊन भेटल्याने तुम्हाला पैनल मध्ये जागा मिळाली नाही..”

मला माफी असावी मी पॅनलचा माणूस पाडून तुम्हाला निवडून आणू शकलो नाही. कारण आपण पक्षाचे काम करणारे आहोत. कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष उभा राहतो, ती केवळ शोभेची ठरायला नको, असेही एकनाथ खडसे म्हणाले. यामुळे व्यासपीठावरील उपस्थितही आवक झाली. रेमंड कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या नेतृत्वातील कामगार उत्कर्ष पॅनलने १० पैकी ८ जागांवर विजय मिळवत वर्चस्व मिळवले होते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like