आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन भरण्याचे आवाहन

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १ नोव्हेंबर २०२२ | सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र शासन व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालये, निम शासकीय कार्यालये, महामंडळे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापना, उद्योग, व्यापार, व्यावसायिक, कारखाने, कंपनी इ. यांनी त्यांच्याकडील माहे 30 सप्टेंबर,2022 या कालावधीचे कार्यरत मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र (ई-आर-1) दि 30 नोव्हेंबर, 2022 पर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पध्दतीने सादर करावे. सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणारा) कायदा, 1959 व नियमावली, 1960 अन्वये त्रैमासिक विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे.

या अनुषंगाने माहे 30 सप्टेंबर, 2022 अखेर आस्थापनेवरील कार्यरत मनुष्यबळाची माहिती दर्शविणारे त्रैमासिक विवरणपत्र (ई आर-1) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावरील नियोक्ता (Employer) या ऑप्शनवर क्लिक करुन आपल्या नियोक्ता लॉग –इन आयडी (Employer Login ID) व पासवर्डच्या सहाय्याने दि.30 नाव्हेंबर, 2022 पर्यंत भरावे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. 0257- 2959790 किंवा [email protected], [email protected] कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, वि.जा. मुकणे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like