पदवीधर मतदार नोंदणीसाठी उरले अवघे सहा दिवस

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १ नोव्हेंबर २०२२ | भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांचेकडील दिनांक 14 जुलै, 2022 रोजीचे पत्रानुसार दिनांक 1 नोव्हेंबर, 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत नाशिक पदवीधर मतदार संघाची यादी नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम दिनांक 7 नोव्हेंबर, 2022 पर्यंत सुरु आहे.

त्यानुसार पात्र पदवीधर आता नव्याने मतदार नोंदणी करु शकणार आहेत. त्यासाठी केवळ सहा दिवस शिल्लक असल्याने दिनांक 1 नोव्हेंबर, 2022 पुर्वी किमान 3 वर्ष आधी पदवी धारण केलेल्या नागरीकांनी तसेच शासकीय / निमशासकीय कार्यालये / शैक्षणिक संस्था/ सहकारी संस्था/ बँका/ औद्योगिक संस्था इत्यादी कार्यालयातील पात्र पदवीधर अधिकारी / कर्मचारी यांनी अर्ज क्रमांक -18 भरुन आवश्यक कागदपत्रांसह संबंधित तहसिलदार कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जळगाव तथा सहा. मतदार नोंदणी अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ यांचे वतीने करण्यात येत आहे. असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like