पालकमंत्र्यांच्या वक्तव्याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे ठिय्या आंदोलन
खान्देश लाईव्ह | ६ नोव्हेंबर २०२२ | शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबद्दल राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ रविवारी ६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर गुन्हे दखल करण्यात यावा या मागणीसाठी जळगाव महापालिका येथून मोर्चा काढून शहर पोलिसांना निवेदन देण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी शहर पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले.याप्रसंगी महापौर जयश्रीताई महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील महाप्रबोधन यात्रा काढण्यात आली. यात धरणगाव, पाचोरा, एरंडोल येथे उपनेत्या सुषमा अंधारे यांची सभा घेण्यात आली. या सभेत बंडखोर आमदार शिंदे गटात दाखल झाल्यानंतर सत्तांतर झाले असा आरोप करून जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार चिमणराव पाटील यांच्या मतदार संघात जाहीर सभा घेण्यात येवून स्थानित सत्त्ताधारी आमदारांवर जोरदार टिक्रास्त्र सोडले. त्यानंतर राजकीय वातावरण तापल्यानंतर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मतदार संघात सुषमा अंधारे यांच्या सभेला बंदी घालण्यात आली. दरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून समस्त नारी जातीचा अपमान केला. या वक्तव्याच्या निषेधार्थ रविवारी ६ नोव्हेंबर रोजी दुपारी ११ वाजता शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षा शहरच्या वतीने महापालिकेसमोर निषेध आंदोलन करण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणी साठी महापालिका येथून निषेध मोर्चा काढून शहर पोलीस ठाण्यात धडकला. शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांची भेट घेवून चर्चा केली.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम