संत सखाराम महाराज दिंडी परंपरेच्या मठासाठी आ. चंद्रकांत पाटील यांना निवेदन

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ६ नोव्हेंबर २०२२ | आदिशक्ती मुक्ताईच्या वारीला संत सखाराम महाराज दिंडी परंपरेच्या मठासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांनी लागलीच सर्व पंच मंडळ यांना सोबत घेवून तिर्थक्षेत्र मुक्ताई मंदिर परिसर गाठून सदग्रुरू सखाराम महाराज मठाची नियोजित जागा पाहणी केली व या ठिकाणी लागलीच निधीची उपलब्धता करून सभागृह मंजूर करून देतो असे सर्वांना आश्वस्थ केले. प्रसंगी सदगुरु सखाराम महाराज दिंडी परंपरेचे गादिपती विश्वंभर महाराज, अध्यक्ष विनायकराव पाटील (पांढर साकळे), उपाध्यक्ष अशोकराव पाटील (काकसाडा), विश्वस्त प्रकाश पाटील (बाभूळगाव), कोषाध्यक्ष ॲड. वीरेंद्र झाडोकार यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, कोथळी उपसरपंच पंकज राणे, नगरसेवक संतोष मराठे,गोपाळ सोनवणे,राजेंद्र तळेले, प्रमोद सोनार,गणेश सोनवणे, स्वीय सहायक प्रवीण चौधरी आदींसह इतर असंख्य भाविक मंडळी उपस्थित होते.

आदिशक्ति मुक्ताईच्या वारीला दशमी, एकादशी व द्वादशी असे तीन दिवसांसाठी मुक्कामी येत असलेल्या संत सखाराम महाराज यांचा परंपरेचा दिंडी सोहळ्याला शंभर वर्षा पासूनची अखंड परंपरा आहे.

 

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like