ऋतुजा लटके यांच्या विजयाचा जळगावात फटाके फोडून जल्लोष

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ६ नोव्हेंबर २०२२ | शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पोटनिवडणूकीत विजयझाल्याने आज महापालिकेसमोर रविवारी ६ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे फटाके फोडून विजयाचा जल्लोष करण्यात आला.याप्रसंगी पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव पाटील, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महापौर जयश्री महाजन, महानगराध्यक्ष शरद तायडे, गजानन मालपूरे, जाकीर पठाण, मनिषा पाटील, मंगला बारी, ज्योती शिवदे, प्रशांत सुरळकर, अमित जगताप, अमोल मोरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने तेथे पोटनिवडणूक झाली होती. यात भाजपने उमेदवार न दिल्यामुळे ही निवडणूक एकतर्फी घेण्यात आली. दरम्यान, या निवडणूकीत पंधराव्या फेरीच्या अखेर ऋतुजा लटके यांना ५५९४६ मते मिळाली व विजय मिळविला.

 

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like