विदर्भ, खान्देशात उष्णतेची तीव्र लाट, हवामान खात्याने वर्तविला अंदाज

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २९ मार्च २०२२ | तापमानातही प्रचंड वाढ झाली असून आजपासून जळगावसह राज्यातील विविध भागात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येणार आहे.तापमान वाढीत मागील पाच दिवस सलग उच्चांकी नोंद अकोल्यात करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णतेची लाट पहायला मिळत आहे. जिल्ह्यात तापमानाचा पार वाढणार असल्याची शक्यता जिल्ह्या हवामान विभागाने वर्तवली आहे.तापमानाने ४० अंशांचा टप्पा गाठल्याने उन्हाच्या झळा आणखीनच तीव्र झाल्या आहेत. विदर्भ, खान्देश आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 30 मार्च रोजी खान्देशातील जळगाव, मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोलीत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

उष्णतेच्या लाटेत उष्माघाताचा घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन, पालिका प्रशासन व आरोग्य विभागात देखील सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी अभिजित राऊत यांनी आज दिल्या आहेत. लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांना देखील उष्णतेच्या लाटेत उपायोजना राबवण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने केले आहे.उन्हाचा पारा वाढल्याने दुपारच्या सुमारास रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे.

यामुळे पुढील काही दिवस उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी वारंवार पाणी पिणे, अनावश्यकपणे घराच्या बाहेर न पडणे, लहान मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात सर्व डॉक्टरांना सतर्क राहण्याचे सूचनाही देण्यात आल्या. सर्वांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like