महावितरणचे कर्मचाऱ्यांबरोबरच महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारला संप

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २९ मार्च २०२२ | जळगावात महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाकडून अद्याप कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने कर्मचारीनी सोमवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे.

शासनाकडून आपल्या मागण्या पूर्ण होण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा असल्याने या लाक्षणिक संपात जिल्हाभरातील सर्व महसूल कर्मचारी सहभागी झालेले होते. आंदोलनाच्या अनुषंगाने सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच तालुकास्तरावर तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालयांसमोर निदर्शने करून घोषणा दिल्या. सर्व कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमा होऊन जोरदार घोषणा बाजी झाली.

आंदोलनामुळे महसूल विभागाचे काम पूर्ण ठप्प होते. मार्चअखेर असल्याने वसुलीची काम देखील बंद होते. याचा वसुली करण्यावर परिणाम झाला. त्यानंतर संघटनेच्या प्रलंबित मागण्यांबाबत जिल्हाधिकारी राऊत यांना निवेदन देण्यात आले. जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे योगेश नन्नवरे, रवींद्र उगले, अतुल जोशी, संदीप गवई, गणेश हटकर, योगेश पाटील, श्री. नूर शेख, सुरेश महाले, महिला प्रतिनिधी प्रिया देवळे, रेखा चंदनकर, अनिता पाटील, सुनंदा पाटील, रेखा कुलकर्णी, महसूल कर्मचारी संघटना तसेच चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like