होळी सणाच्या दिवशी पहा आजचे राशीभविष्य

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १७ मार्च २०२२ |  मेष : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. काहींची वैचारिक प्रगती होईल.गृहिणी आपल्या आवडत्या छंदास वेळ देतील.

वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल.विद्यार्थ्यांची प्रगती कौतुकास्पद राहील.

मिथुन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.घराबाहेर डोके शांत ठेवलेले बरे.

कर्क : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.आर्थिक स्थिती उत्तम असल्याने तुमची मनस्थिती ही चांगली असेल.

सिंह : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.एखादा जोडधंदा असेल तर त्यातून चांगली आवक होईल.

कन्या : वाहने जपून चालवावीत. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.आज काही देणी द्यावी लागतील. विवाह विषयक चर्चा आज नकोत.

तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग होईल.मित्रच आज तुम्हाला हिताचे सल्ले देतील.

वृश्‍चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात प्रसिद्धी लाभेल. व्यवसायात वाढ होईल.अधिकारी वर्गाच्या तुमच्या बद्दलच्या अपेक्षा वाढतील.

धनु : जिद्दीने कार्यरत राहाल. हितशत्रुंवर मात कराल. गुरुकृपा लाभेल.कायदा मोडण्याचा विचारही मनात आणू नका.

मकर : धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल.अनपेक्षित मोठे खर्च उद्भवल्याने आर्थिक ओढाताण संभवते.

कुंभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.एखाद्या मंगल कार्यात जोडीने उपस्थित रहाल. प्रवासात मात्र खोळंबा होण्याची शक्यता आहे.

मीन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.कार्यक्षेत्रात हितशत्रू मित्रांमध्ये ही लपलेले असू शकतात सतर्क रहा.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like