सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, लवकर खरेदी करा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १७ मार्च २०२२ | आज होळी निमित्त सोन्याचे दागिने खरेदी करायचे असतील तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.बुधवारी सोने १७६ रुपयांनी तर चांदी १८ रुपयांनी स्वस्त झाली. या घसरणीनंतर सोने ५१००० प्रति 10 ग्रॅम आणि चांदी ६७००० रुपये प्रति किलोवर आली आहे.

आज जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याच्या किंमतीत ४२० रुपयाची घसरण झाली आहे. आज गुरुवारी जळगाव सुवर्ण नगरीत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५२,३५० रुपये इतका आहे. तर चांदी ६८,८८० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

रशियाच्या या निर्णयामुळे देशांतर्गत सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. युद्धाचे पडसाद भारतीय बाजारेपेठेवरही उमटताना दिसतायत. ,जळगाव सराफ बाजारात गेल्या तीन दिवसात सोन्याच्या दरात जवळपास २५०० रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात ३५६० रुपयाची वाढ झाली आहे. मात्र आज दोन्ही धातूंमध्ये घसरण झाल्याने दिलासा मिळाला आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like