पेट्रोल डीझेलसाठी आज किती मोजावे लागणार पैसे

खान्देश लाईव्ह | १७ मार्च २०२२ | तेल विपणन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती प्रति लिटर 9 रुपयांनी वाढवू शकतात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची भीती लोकांमध्ये आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीने १४ वर्षांचा उच्चांक गाठला आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना धक्का बसू शकतो.देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २५ रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.
आज जळगावमध्ये एका लिटर पेट्रोलचा दर ११०.८७ रुपये इतका आहे. तर डिझेलचा ९३.६३ रुपये प्रति लिटर इतका आहे. नोव्हेंबरपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. 3 महिन्यांपासून सरकारी तेल कंपन्यांनी तेलाच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत. गुरूवारी देशभरातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशात रोज 45 लाख बॅरल कच्च्या तेलाचा पुरवठा केला जातो.
जर रशियासोबत करार झाला तर काही महिन्यातच भारताकडे पुरवठा होईल आणि परिणामी देशात इंधन स्वस्त होईल.अनेक देशांना महागाईचा सामना करावा लागत आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे.
धुळे १०९.६९ ९२.४९
गडचिरोली ११०.६३ ९३.४२
गोंदिया १११.५७ ९४.३२
बृहन्मुंबई १०९.९८ ९४.१४
हिंगोली ११०.०७ ९३.८४
जळगाव ११०.८७ ९३.६२
जालना १११.०८ ९३.८२
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम