राज्य सरकारनं जाहीर केली होळी आणि धुलीवंदनाची नियमावली

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १७ मार्च २०२२ | राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी संकट टळलेले नाही. राज्यात मागील दोन वर्षं सतत कोरोनासंसर्गाचा प्रादुर्भाव असल्याने बऱ्यापैकी सण आणि उत्सव साजरे करणाऱ्यावर निर्बंध होते. कोरोनासंसर्गाचं प्रमाण आता कमी झाल्याने अनेक निर्बंध शिथिल करण्यात आलेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने होळी, धुलिवंदनला परवानगी दिली असली तरी नियमावली आखून दिली आहे.

होळी आणि धुलिवंदनासाठी राज्य सरकारनं नवी नियमावली घोषित केली आहे. नियमपाळले नाही तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आदेश गृह मंत्रालयाने दिले आहेत. आज रात्री दहाच्या आत होळी दहन करावी तसेच डी.जे. लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोरोना अजूनही पूर्णपणे संपलेला नसल्याने मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग या गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे. सध्या कोरोनाचं प्रमाण कमी झाल्यानं अनेक निर्बंध शिथिल केले आहेत.

असे आहेत होळी आणि धुलीवंदनाची नियमावली :

रात्री दहाच्या आत होळी पेटवणं बंधनकारक.

सर्व मंडळांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावं. आदेशाचं उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

डीजे लावण्यास बंदी, डीजे लावल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार.

होळी साजरी करताना मद्यपान आणि बीभत्स वर्तन केल्यास कारवाई.

महिलांची आणि मुलींची खबरदारी घ्यावी.महिलांनी परिधान केलेल्या दागिन्यांची आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी.

दहावी आणि बारावीची परीक्षा असल्याने लाऊड स्पीकर जोरात लावू नये, जोरात लावल्यास कारवाई.

कोणत्याही जाती, धर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये.

धुलवडीच्या दिवशी जबरदस्तीने रंग, पाण्याचे फुगे फेकू नये.

होळी सणानिमित्त कोणीही मोठी आग लागणार नाही, होळी पेटवताना होळीतील आग वाऱ्याने उडून कोणाच्या घरावर जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like