राज्यात उष्णतेमुळे तापमान पोहोचले ४४ अंशावर
खान्देश लाईव्ह | १७ मार्च २०२२ | यंदा जोरदार पावसानंतर आता उष्णतेचाही पारा जोराने वाढू लागला आहे. या वर्षी होळीच्या आधीच उन्हाच्या झळा बसू लागल्या. राज्यात उष्णतेची लाट आली असून जळगाव शहरासह ईतर जिल्ह्याचे तापमान बुधवारी दुपारी ४१ अंशावर पोचले. जिल्ह्यात तापमानाचा पारा १६ ते २१ मार्च दरम्यान ४४ अंशापर्यंत जाईल, असा इशारा हवामान विभागाने अगोदरच दिला होता. त्याचा प्रत्यय येण्यास सुरुवात झाली आहे.
बुधवारी राज्यातील अकोला व भुसावळात सर्वाधिक ४२.९ तापमानाची नोंद झाली. दुसरीकडे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) २१ मार्चपर्यंत उष्णतेच्या सरासरीपेक्षा अचानक तापमान वाढ होऊन उष्णतेच्या लाट सौम्य लाटेचा इशारा दिला आहे. कमाल तापमान ४० ते ४३ अंश सेल्सियस राहू शकते, असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. तापमान वाढल्याने सर्वांच्या अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे.
राज्यात उष्णतेची लाट आली असून बुधवारी राज्यातील १२ शहरांतील तापमानाने चाळिशी पार केली. अशातही अनेक जण तापमानापासून बचावात्मक साधनांचा वापर करून आपली नियमित कामे करताना दिसत आहे. सकाळी नऊपासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले होते. राज्यातील उष्णतेची लाट गुरुवारपर्यंत कायम राहणार असून त्यानंतर हळूहळू कमी होईल, असे नाशिकचे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.
परभणी : ४०.७
चंद्रपूर : ४०.६
यवतमाळ : ४०.५
जळगाव ४१.०
नांदेड : ४०.०
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम